पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुलढाण्यात हिंदू अधिकाऱ्यानं मुस्लिम चालकासाठी केला रमजानचा उपवास

संजय माळी

'पहिली माणूसकी येते, धर्म नंतर येतो. म्हणूनच प्रत्येक माणसानं माणूसकी जपण्यासाठी छोटीशी का होईना पण एकमेकांना मदत केली पाहिजे',  बुलढाणामध्ये कार्यरत असलेले संजय माळी सांगतात. संजय माळी हे वन अधिकारी आहेत. गेल्या एक महिन्यापासून ते आपल्या मुस्लिम चालकासाठी रमजानचे उपवास पाळत आहेत.

रमजानचा महिना हा मुस्लिम बांधवांसाठी पवित्र महिना असतो. या  काळात मुस्लिम बांधव उपवास धरतात. माळी यांचा चालक जफरला तब्येतीच्या  कारणामुळे उपवास धरता आले नाही. '६ मे रोजी मी जफरला तुझ्यासाठी रमजानचे उपवास धरू का असं विचारलं. जफरची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठिक नाही तसेच त्यामुळे  त्याला उपवास धरता आले नाही. तुझ्यासाठी मी उपवास धरेन असं मी जफरला सांगितलं. ६ मे पासून मी जफरसाठी रमजानचा उपवास धरत आहे. रोज पहाटे ४ वाजता उठून मी खातो त्यानंतर संध्याकाळी सात वाजत मी पुन्हा उपवास सोडतो' असं  माळी एएनआयला दिलेल्या मुलाखती म्हणाले. 

प्रत्येक धर्म आपल्याला काहीतरी चांगलं शिकवत असतो. आपण या चांगल्या गोष्टी समाजात पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. तरच सलोखा वाढेल असं माळी म्हणतात. आपण धर्माआधी माणसूकीचा विचार पहिल्यांदा  केला पाहिजे आणि ती जपण्यासाठी प्रत्येकानं छोटे का होईना पण प्रयत्न केले पाहिजे असं माळी मानतात. आपल्या आजारी मुस्लिम चालकासाठी उपवास धरून माळी यांनी  समाजास एक आदर्श उदाहरण दिलं आहे. त्यांच्या या कृतीचं देशभारातून कौतुक  होत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: hindu Divisional Forest Officer in Buldhana is keeping roza in place of his muslim driver