पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवा वाद! उच्च शिक्षण मंत्री उदय सामंतही 'ज्ञानेश्वर विद्यापीठा'चे विद्यार्थी

उदय सामंत आणि विनोद तावडे

पूर्वीचे युती सरकार गेले आणि आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. परंतु, जुने वाद नव्या सरकारलाही लागू झाल्याचे दिसते. राज्याचे नवनियुक्त उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या शिक्षणावरुन नवा वाद सुरु झाला आहे. यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामंत यांनी शिखर संस्थांची मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाइल अभियांत्रिकेची पदविका घेतल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची अभियांत्रिकीची पदवीसुद्धा याच विद्यापीठाची होती. त्यावेळी यावरुन मोठा वाद झाला होता. त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. तीच परिस्थिती आता सामंत यांच्यासमोर येऊन ठेपली आहे. 

खातेवाटपानंतर मंत्र्यांच्या नाराजीत वाढ, मिळालेल्या खात्यावरून असमाधान

महाविकास आघाडीचे रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर जाहीर झाले. यात उदय सामंत यांना उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. सामंत यांनी विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाइल अभियंत्रिकेची पदविका घेतल्याची माहिती दिली आहे. 

इराकवर भडकले डोनाल्ड ट्रम्प, इराणलाही दिली धमकी

त्यांचे शालेय शिक्षण हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून झाले आहे. त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाइल अभियांत्रिकी पदविका पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. मान्यता नसलेल्या विद्यापीठाची पदविका पूर्ण करणाऱ्या सामंत यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, तंत्रशिक्षण संचालनालय अशा कोणत्याच प्रशासकीय शिखर संस्थेची मान्यता नाही.

जेएनयू हिंसाचारः मुंबईत मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:higher education minister uday samant student of dnyaneshwar university pune vinod tawade