पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर; बचावकार्यासाठी नौदल दाखल

कोल्हापूरमध्ये अनेक भागात पाणी साचले आहे

कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमधील पूरस्थिती गंभीर झाली असून, कोल्हापूरमध्ये बचावकार्यासाठी नौदलाची पाच पथके दाखल झाली आहेत. पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांनी रौद्ररुप धारण केल्यामुळे शहरांमध्ये आणि काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यातच सुरक्षेच्या कारणास्तव पाणी साठलेल्या भागात वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. तर पाणी पुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे.

सुषमा स्वराज यांनी ती फी घेण्यासाठी हरिश साळवेंना घरी बोलावले होते आणि...

पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरात अनेक भागात पाणी साचले आहे. व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, खानविलकर पेट्रोल पंपाचा भाग या ठिकाणी दोन दिवसांपासून पाणी आहे. शिरोली पुलावरून पाणी वाहू लागल्यानंतर मुंबई ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही मंगळवारी सकाळी बंद करण्यात आली होती. 

सांगलीमध्ये कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीचे पाणी ५४ मीटरपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सांगली शहराच्या भागात नदीपासून दीड किलोमीटरपर्यंत पाणी आले आहे. कोयना धरणातून विसर्ग कमी न झाल्यास शहरातील स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. खणभाग, नळभाग या दाट लोकवस्ती असलेल्या भागात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात भिलवडी गावामध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची दोन पथके तिथे दाखल झाली आहेत. 

INDvWI 3rd T20I: कोहली ब्रिगेडचा विंडीजला व्हाइट व्हॉश

आलमट्टी धरणातील विसर्ग वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकारकडे केली आहे. तर दुसरीकडे कोयना धरणातील विसर्ग कमी करण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याकडून महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली आहे.