पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा

सांगली पूर

सांगली, सातारा, कोल्हापूरातील पूरस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सध्या सांगली, कोल्हापूरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूर वाढत चालला आहे. दरम्यान, येत्या 24 तासांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जम्मू-काश्मीरबाबत निर्णय घेण्यापूर्वी भारताने सांगितलं नाहीः अमेरिका

कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना, राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. कोयना, कृष्णा नदींनी धोक्याची पातळी ओलांडी आहे. नदीला आलेल्या पूराचे पाणी आणखी गावांमध्ये शिरले आहे. सांगलीवाडी, भिलवडी गावामध्ये पूराचे पाणी शिरले आहे. या गावांमध्ये हजार पेक्षा जास्त लोकं अडकली आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राणाप्रताप चौक, कॉलेज कॉर्नरजवळ कमरे इतके पाणी साचले आहे.

कलम 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

मुसळधार पडणारा पाऊस आणि पूरस्थिती पाहता सातारा, सांगली, कोल्हापूरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख मार्ग बंद करण्यात आले आहे. तर पूराचा फटका गोकुळ दूधाला देखील बसला आहे. गोकुळचे 10 लाख लिटर दूध शिल्लक राहिले आहे तर साडेपाच लाख लिटर दूध टँकरमध्ये अडकले आहे. 

येत्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार; हवामान खात्याचा इशारा