पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगबुडी, वाशिष्ठी नदीला पूर; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

जगबुडी पूल

मुंबईपाठोपाठ कोकणातही मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळून, राजापूर, गुहागरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे या भागामध्ये नदी, नाल्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी गावामध्ये शिरले आहे. त्यामुळे गावातील बाजारपेठ, घरं पाण्याखाली गेली आहे. नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

वांगणीजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबवली; ७०० प्रवासी अडकले

दरम्यान, रत्नागिरीमधील जगबुडी नदीने आणि चिपळूण येथील वाशिष्ठी नदीने धोक्याती पातळी ओलांडली आहे. नदी पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. नदी पुलावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपच्या वाटेवर?

शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा चिपळूण, राजापूरला सर्वाधिक फटका बसला आहे. पावसामुळे चिपळून येथील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. बाजारपेठेमध्ये कंबरे इतके पाणी साचले आहे. दरम्यान, कोकणामुळे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

येडियुरप्पांकडून जुने आदेश स्थगित, २९ जुलैला विश्वासदर्शक