पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येत्या ४८ तासात राज्यात मेघगर्जनांसह जोरदार पावसाची शक्यता

पाऊस

अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरामध्ये शनिवारप्रमाणेच रविवार आणि सोमवारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी सकाळपासून याठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. 

पंकजा यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल धनंजय मुंडेंविरोधात गु्न्हा

भारतीय हवामान खात्याने मान्सून माघारी गेला असल्याचे जाहीर करून सुध्दा राज्यातील अनेक भागामध्ये पाऊस पडत आहे. मुंबईसह मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी दिवस भर तसाच होता. त्यामुळे मुंबईकरांची एकच तारंबळ उडाली. त्याचसोबत प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने भर पावसात नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी प्रचार केला. पावसामुळे दिवाळीच्या तयारीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे हाल झाले. दरम्यान, रविवारी आणि सोमवारी मतदानाच्या दिवशी देखील या भागामध्ये असाच पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

कलाकारांनी PM मोदींसोबत केली गांधी विचारांबाबत खास चर्चा

महाराष्ट्र

Channel/Agency बीजेपी कांग्रेस अन्य
India Today Axis 102-120 102-120 102-120
India Today Axis 102-120 102-120 102-120
India Today Axis 102-120 102-120 102-120

हरियाणा

Channel/Agency बीजेपी कांग्रेस अन्य
India Today Axis 102-120 102-120 102-120
India Today Axis 102-120 102-120 102-120
India Today Axis 102-120 102-120 102-120

दरम्यान, कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. २० आणि २१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरमध्ये देखील २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बीड, उस्मानाबादमध्ये २० ते २१ या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

पंकजा मुंडे भोवळ येऊन व्यासपीठावर कोसळल्या