पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीः कृष्णा नदीची पातळी ३३ फुटांवर, एनडीआरएफच्या पथकाला पाचारण

सांगलीतील आयर्विन पुल (संग्रहित छायाचित्र)

सतत सुरु असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. कृष्णा नदीची पातळी ही ३२.८ फुटांवर आली आहे. हवामान विभागाने येत्या तीन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोयना नदीतूनही विसर्ग सुरु आहे. शनिवारच्या तुलनेत विसर्ग कमी केला असला तरी पुराचा धोका कायम आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या लोकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. प्रशासनाने एनडीआरएफच्या दोन पथकांना सांगलीत पाचारण केले आहे. हे पथक सोमवारी सांगलीत दाखल होईल.

गडचिरोलीत पूरसदृश्य स्थिती, अहेरीत २५ गुरांचा विद्युत प्रवाहाने मृत्यू

रविवारी कृष्णा नदीची पातळी २९ फूट इतकी होती. ती आज ३२.८ फुटांवर आली आहे. नदीतून येणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यास आणि पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा नदी लवकरच इशारा पातळी गाठेल असेल सांगण्यात येते. या नदीची इशारा पातळी ही ४० फूट तर धोक्याची पातळी ४५ फूट इतकी आहे. सूर्यवंशी प्लॉटमधून काही कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आले आहे

एका महिन्याच्या मुलीवर तोल जाऊन पडल्याने तिचा मृत्यू

अलमट्टी धरणातूनही २ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात येते. पाणी पातळी वाढली तरी नदी पात्रातूनच वाहती राहिल, असे प्रशासनाला वाटते.

ख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यार्‍या पुजा मोरेंना उस्मानाबादेत अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:heavy rain in sangli water level of krishna river increased possibility of flood continue