पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगली, कोल्हापूरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; जिल्हा प्रशासन सज्ज

धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

सांगली, कोल्हापूर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. या नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच गावकऱ्यांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर येत्या दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

चांद्रयान २ साठी महत्त्वाचा क्षण, विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर उतरणार

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरुच आहे. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. राधानगरी धरणाचे ५ स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर कोयना आणि वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ३३ फुटांवर पोहचली आहे. पंचगंगा नदीचे पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.  

तिहारमध्ये चिदंबरम यांना कोणत्याही विशेष सुविधा नाही, फक्त...

तर, सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी २८ फुटांवर पोहचली आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. संबंधित सर्व विभागांना तसेच कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सांगलीतील  मौजे डिग्रज बंधारा आणि सांगलवाडी बंधारा पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावाचा संपर्क तुटला आहे.

निवडणूक तयारीला वेग, प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश

दरम्यान, धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवत असल्यामुळे सांगली, कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारपर्यंत कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

रशिया दौऱ्यातील मोदींच्या 'या' व्हायरल व्हिडीओचे होतेय कौतुक