पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सांगलीत कृष्णा, वारणा नदीला पूर; 100 गावांचा संपर्क तुटला

सांगली पूर

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला झोडपून काढले आहे. पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीला पूर आला आहे. या पूरामुळे सांगली जिल्ह्यातल्या 100 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. पूराचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तर पूरात फटका बसलेल्या गावातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर

सतत पडणारा मुसळधार पाऊस, चांदोली आणि कोयणा धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीला पूर आला आहे. या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीवरील पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पूरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूराचे पाणी गावामध्ये शिरल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. तर नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे हजारो कुटुंबासह जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर

अतिवृष्टी आणि पूराचा धोका पाहता सांगली जिल्हा प्रशासनाने मिरज, वाळवा, बत्तीस शिराळा आणि कडेगाव या चार तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पूराचे पाणी पुलावर आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. तर शहरातील दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, कर्नाळ रोड या भागामध्ये पूराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे हा परिसर जलमय झाला आहे. 

जम्मू-काश्मीर होणार केंद्रशासित प्रदेश; कसे बदलणार अधिकार