पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जगबुडी, वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

जगबुडी नदीला पूर

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पुन्हा पूर आला आहे. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे मुंबई -गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. या महामार्गवर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान चिपळूनला देखील पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे चिपळून शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. जगबुडी नदी प्रमाणे चिपळूनमधील वाशिष्ठी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. या दोन्ही नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

चीनला धक्का, ३० वर्षांनंतर प्रथमच जीडीपीत घट

दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज रत्नागिरी, चिपळून, संगमेश्वर आणि खेडमध्ये सकाळपासून दमदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर रत्नागिरीला रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचे पाणी पुलावर आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, नदी पुलावर पोलीस आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. 

बीडमध्ये दोन दिवसात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या

दरम्यान, संगमेश्वर आणि चिपळूनमदध्ये देखील तीच परिस्थिती आहे. याठिकाणी देखील पावसाने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीला पूर आला आहे. या नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे नदी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे या सर्व जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळून बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. तसंच नद्यांना आलेल्या पूरामुळे खेडमधील बाजार पूल, वड नाका, खाटीक आळी हे देखील पाण्याखाली गेले आहेत.

साक्षी आणि अजितेश यांना एकत्र राहण्याचे कोर्टाचे आदेश