पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूरः राधानगरी धरणाचे ५ दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा

राधानगरी धरण (संग्रहित छायाचित्र)

धरणक्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच  स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली असून नदीकाठच्या गावांना वेळीच स्थलांतरीत करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, कोल्हापुरात पावसाने उघडीप दिली आहे. तत्पूर्वी, राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडण्यात आले होते.

शहादाः गणेश विसर्जनासाठी गेलेल्या ६ तरुणांचा बुडून मृत्यू

नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत इशारा पातळीच्या दिशेने वाढ होत आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ३८ फूट ४ इंचावर आहे. 

सांगली, कोल्हापूरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; जिल्हा प्रशासन सज्ज