पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीतील पर्लकोटा नदीला पूर; १०० गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली पूर

गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.  कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत असल्याने पूराचे पाणी भामरागड शहरात शिरले आहे. तसंच पूरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.  

काश्मिरात दोन जिवंत दहशतवाद्यांना लष्कराने पकडले

पूरामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेला इशारा देण्यात आला आहे. नदी काठी राहणाऱ्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. पूराचे पाणी शहरात शिरल्यामुळे अनेक घरं, दुकानं पाण्याखाली गेली आहेत. या पावसाळ्यात पाचव्यांदा पर्लकोटा नदीला पूर आला आहे.

मुंबईतील गणपती मंडपात शिरले पावसाचे पाणी

दरम्यान, आलापल्ली- भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याला पूर आल्याने भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. पार्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळं सुमारे १०० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. यावर्षी पाचव्यांदा पूरामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. 

आमीर खानने मागितली माफी, नेटिझन्सनी उडविली खिल्ली