पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पर्लकोटा नदीला पूर; भामरागडचा संपर्क तिसऱ्यांदा तुटला

गडचिरोली पूर

गडचिरोली जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पुन्हा पूर आला आहे. त्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तिसऱ्यांदा तुटला आहे. भामरागड तालुक्यात येणाऱ्या 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. पर्लकोटा नदीवरील पुलासह आलापल्ली ते भामरागड दरम्यानच्ये अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे दुर्गम गावांचा संपर्क तुटला आहे. 15 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा भामरागड तालुक्याल पूराचा फटका बसला आहे. 

कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर; बचावकार्यासाठी नौदल दाखल

गडचिरोली जिल्ह्याला गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातल्या पर्लकोटा, प्राणहिता, गोदावरी, बंडिया, पामुलगौतम या नद्यांना पूर आला आहे. पर्लकोटा नदीचे पाणी मोठ्या पुलावर आल्यामुळे भामरागड तालुक्याचाच संपर्क तुटला आहे. तर तालुक्यातील इतर गावांचा देखील संपर्क तुटला आहे. पूर येऊन संपर्क तुटण्याची ही तिसऱ्यांदा घटना घडली आहे. तर, अहेरी तालुक्यातल्या जिमलगट्टा ते देचलीपेठा दरम्यान किस्टापूर नाल्याला पूर आल्याने देखील 25 गावांचा संपर्क तुटला आहे. 

सुषमा स्वराज यांनी ती फी घेण्यासाठी हरिश साळवेंना घरी बोलावले