पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात पावसाची दमदार हजेरी, विटा-कराड मार्ग बंद

विटा-कराड मार्ग बंद झाल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

राज्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसत आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, कोल्हापूर, वाशिमसह अनेक जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुणे आणि मुंबईत रात्रभर विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु होता. नंतर सकाळच्या सुमारास संततधार सुरु होती. मुंबईत येत्या चार ते सहा तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, पावसामुळे विटा-कराड मार्ग बंद झाला आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातील माण-खटाव येथेही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तब्बल सात वर्षांनंतर तेथील येरळा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे बळीराजा सुखावला आहे. 

सेल्फीच्या नादात महिला दरीत पडली; सुदैवाने वाचली

मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीतही मुसळधार पाऊस पडला. सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विटा-कराड मार्ग बंद झाल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु करण्यात आली आहे. 

लातूर शहरासह निलंगा, अहमदपूर येथे जोरदार पाऊस पडला. सोलापूर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस पडला. सोलापूर जिल्ह्यात पावसाळा संपत आला असतानाही अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. परतीच्या पावसाने पिकांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न काही अंशी सुटला आहे. 

बीडला पावसाने झोडपले; पोलिस ठाण्यात शिरले पाणी

बीड शहरात १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. कपिलधारा धबधब्यालाही अखेर पाणी सुरु झाले आहे. वणी येथे पावसामुळे सप्तश्रृंगी गडाला पाझर फुटला आहे. वाशिम येथील संगमेश्वर प्रकल्प भरला असला तरी जिल्ह्यातील इतर प्रकल्प हे फक्त ५० टक्के भरले आहेत.