पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयाने पाहू नका: आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयाने पाहू नका. गावात कोणाला येऊ देणार नाही हे वर्तन शोभण्यासारखे नाही. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीकोनातून वर्तन करा, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गावाकडे आलेल्या लोकांकडे कोरोनाबाधित आहेत या संशयातून पाहणे हे माणुसकीच्या दृष्टीकोनातून योग्य नसल्याचे सांगितले.

बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट शिथिल, ATM लाही दिलासा

राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहेत. त्यामुळे घाबरलेले मुंबई, पुण्यातील नागरिक आपल्या गावाकडे जात आहेत. अशामध्ये काही गावांमध्ये या नागरिकांना येऊन दिले जात नाही अशा घटना समोर आल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्र्यांनी गावाकडील नागरिकांना माणुसकीच्या दृष्टीकोनातून वर्तन करा, माणुसकी सोडून नका. पुण्या मुंबईतील नागरिकांना संशयाने बघू नका, असे आवाहन केले.

एक कोरोनाबाधित रुग्ण कमाल चार जणांपर्यंत संसर्ग पसरवू शकतो, संशोधन

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची गोष्ट आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वांकडून मदत होत आहे. यापुढे देखील अशीच मदत करा, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात संचारबंदी आहे. तरी सुध्दा नागरिक भाजीपाला खरेदीसाठी तसंच धार्मिकस्थळांमध्ये गर्दी करत आहेत. अशा नागरिकांना गर्दी करु नका, माणुसकीने वागा, सतर्क आणि जागरुक रहा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:health minister rajesh tope says dont look at the citizens of pune and mumbai with suspicion