पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीस यांच्यावरून ट्विटरवर रंगले हॅशटॅग युद्ध!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच आता ट्विटरवर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरून हॅशटॅग युद्ध रंगले आहे. मंगळवारी सकाळी ट्विटरवर #RejectFadnavisForCM हा हॅशटॅग भाजप आणि फडणवीसविरोधी युजर्सकडून वापरण्यात येऊ लागल्यानंतर लगेचच #MaharashtraNeedsDevendra हा हॅशटॅग भाजप आणि फडणवीस समर्थकांकडून वापरण्यात आला. सध्या #MaharashtraNeedsDevendra हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतो आहे.

सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले की...

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्टोबरला लागले. पण अद्याप राज्यात सरकार कोणाचे येणार, मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल निश्चित असे काहीच सांगता येत नाही. मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला असला, तरी निकालानंतर शिवसेनेने ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युल्याचा विषय लावून धरला असून, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा आग्रह धरला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडण्यास भाजप तयार नाही. त्याचबरोबर महत्त्वाची खाती शिवसेनेला देण्यासही अगोदर भाजप तयार नव्हता. पण शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर खात्यांचे समसमान वाटप करण्यास भाजप तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पण मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजप तयार नाही.

'माझा आमदार, माझा मुख्यमंत्री', 'मातोश्री' बाहेर पोस्टरबाजी

दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावर कायम राहण्यावरूनही बऱ्याच राजकीय घडामोडी घडताहेत. काही जणांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी पुन्हा नको आहेत. त्यामुळेच आता ट्विटरच्या माध्यमातूनही त्यांच्याविरोधात वातावरण निर्मिती केली जाते आहे. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी भाजपसमर्थक आणि फडणवीससमर्थक त्यांच्या समर्थनार्थ ट्विट करीत आहेत.

ट्विटरवर काय ट्रेंड होते आहे