पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हर्षवर्धन जाधवांनी स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केलीः चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांना त्यांचा पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ज्याने आपल्या वडिलांना, आईला आणि वहिनाची हत्या केली. अशा माणसाला तुम्ही मतदान केले. त्यांनी स्वतःच्या बायकोचा छळ केला. त्या पोलिसांकडे तक्रार करायलाही निघाल्या होत्या, असा आरोपही खैरे यांनी यावेळी केला. भावूक झालेल्या खैरेंनी यावेळी पराभव पाहण्याआधीच मी मेलो का नाही, अशा अत्यंत तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती- धनंजय मुंडे

ते म्हणाले, माझी काय चूक झाली होती. अनेक जण ट्रॅक्टरवर बसून गेले. ते आज सर्वजण रडत आहेत. आता त्यांना माफ करु. असे केले नाहीतर समाजात दुही माजेल. मला तुम्ही निवडणुकीला उभे राहू नका असे सांगितले असते तर मी उभारलोही नसतो. गेली २० वर्षे मी औरंगाबादचा खासदार होतो. लोकांची कुठलीही कामे मी तत्परतेने केली. माझे स्वतःचे घरही मी बांधले नाही, माझ्या घराकडे दुर्लक्ष करुन मी औरंगाबादकरांसाठी काम केले. मात्र, असे कोणते वाईट काम मी केले. ज्यामुळे तुम्ही माझा पराभव केला. हा पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला.

गोव्याला जाणाऱ्या औरंगाबादच्या ७ तरुणांचा बेळगावात अपघाती मृत्यू

यावेळी आपल्या पराभवाला कारणीभूत ठरलेले उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्यावरही ते भडकले. हर्षवर्धन जाधवांनी आपल्या आई-वडिलांची, वहिनीची हत्या केली. स्वतःच्या बायकोला अनेकदा मारहाण केली, असे आरोप यावेळी खैरे यांनी केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:harshawardhan jadhav kill his mother and father blame by shiv sena leader chandrakant khaire