पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विदर्भात गारपिटीसह पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

गारपीट

नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये गारपीट झाली आहे. बुधवारी पहाटे नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसासह गारपीट झाली आहे. पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे. 

फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं: एकनाथ खडसे

नागपूर जिल्ह्यातील मोहपा परिसरात गारपीट झाली आहे. पहाटे अडीचच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. गारपीटमुळे शेतीसोबत घरांचे देखील नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. 

खातेवाटपासंदर्भात अजित पवार म्हणाले, तुटेपर्यंत ताणायचं नसतं

गारपीट आणि अवकाळी पावासामुळे कापूस, संत्रा, गहू, तूर, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. दरम्यान, वाशिम, नांदेड, हिंगोली, यवतमाळ या भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे याठिकाणी देखील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

'थोडे थोडे दिवस करून आम्ही पाच वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करू'