पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कळंबमध्ये दोन गटांत भांडणातून गोळीबार, तिघे गंभीर जखमी

गोळीबार (प्रतिकात्मक छायाचित्र)

कळंब येथे दोन गटात शनिवारी सायंकाळी सहा वाजता झालेल्या भांडणात तिघांवर गावठी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला. घटनेतील गंभीर जखमींना उपचारासाठी अंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारामुळे कळंबमध्ये तणावाची स्थिती असून शहराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

शिक्षक नव्हे कसाई; ३ मुलांसह पत्नीची केली हत्या

कळंब शहरातील शिवाजी चौक ते साठे चौक परिसरात पारधी समाजाचे वास्तव्य आहे. मागील काही दिवसांपासून या समाजाच्या दोन गटांत जुन्या भांडणावरून वाद चालू होता. शनिवारी सायंकाळी या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये एक गटाने दुसऱ्या गटावर गावठी कट्ट्याने गोळीबार केला. या मध्ये विकास बापू पवार (२०), राहुल बापू पवार व बापू विष्णू धोत्रे या तिघांना गोळी लागली. यामध्ये काही युवकांनी तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जखमींना सुरुवातीला कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी अंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नाशिकः कॉन्स्टेबलचा सावत्र मुलांवर गोळीबार, दोघांचाही मृत्यू