पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिलासा!, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपालांकडून मदतीची घोषणा

शेतकरी

परतीच्या पावसाने मोठा फटका बसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्यपालांनी दिलासा दिला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्यांना शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८ हजार रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टर १८ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. राज्यपालांनी ही मदत शेतकऱ्यांना त्वरीत देण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर राज्यपालांनी शेतसारा आणि शाळा-महाविद्यालयांचे शूल्क माफ करण्यात आले आहे.

तिसऱ्या दिवशीच 'शेर ए बांग्ला' ढेर! भारताचा 'विराट' विजय

नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर निवडणुका आणि राज्यातील अस्थिर राजकीय स्थितीमुळे बळीराजा आणखी संकटात सापडला होता. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेत्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमदार बच्चू कडू यांच्या संघटनांनी आंदोलने केली. अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. यासाठी २ हेक्टरची अट ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी ही मदत अल्प असल्याचे सांगत आपली नाराजी दर्शवली. मदतीचे लवकरच वाटप होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अयोध्यावर निर्णय देणाऱ्या सरन्यायाधीश गोगोईंना झेड प्लस

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Governor announces a relief agricultural Kharif crops and horticulture perennial crops following damage to crops by unseasonal rains