पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्यावसायिक वाहने चालविण्यासाठी लवकरच कमाल वयोमर्यादा, राज्य सरकारचे प्रयत्न

प्रातिनिधिक छायाचित्र

व्यावसायिक वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांसाठी लवकरच कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात येण्याची शक्यता आहे. म्हणजेच ठराविक वय झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला व्यावसायिक वाहन चालविता येणार नाही. रस्ते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक नुकतीच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्त्वाखाली झाली. या बैठकीत या विषयावर अभ्यास करण्याचे निश्चित करण्यात आले. ट्रक, बस, टॅक्सी अशी सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने चालविणाऱ्यांसाठी हा अभ्यास करण्यात येईल.

गाडीवर उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याची जबाबदारी वाहन मालकांकडे, नवा प्रस्ताव

भविष्यात अशा स्वरुपाचा निर्णय घेतला गेल्यास त्यावरून राज्यात वाद उदभवण्याची शक्यता आहे. कारण आता व्यावसायिक वाहने चालविण्यासाठी कायद्यानुसार कोणतीही कमाल वयोमर्यादा नाही. फक्त मोटार वाहने कायदा १९८८ नुसार वयाची ५० शी ओलांडल्यानंतर प्रत्येक वाहन चालकाला दर पाच वर्षांनी आपल्या वाहन परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. रावते या बैठकीमध्ये म्हणाले, वयाची ठराविक वर्षे पूर्ण झाल्यावर वेगवेगळे आजार उदभवतात. ज्यामध्ये दृष्टी कमजोर होणे याचाही समावेश होतो. त्यामुळे वाहनचालकाची क्षमता कमी होते. त्यामुळेच या विषयात कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी अभ्यास करण्यात येतो आहे. 

गेल्या २७ मे रोजी सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काम करणारे वाहनचालक वयाच्या ५८ ते ६० वर्षांमध्ये सेवानिवृत्त होत असतात. खरंतर हेच निवृत्तीचे आदर्श वय आहे. त्याची सर्व ठिकाणी अंमलबजावणी केली गेली पाहिजे.

मोठी घोषणा, मारुतीच्या डिझेल कारची पुढील वर्षापासून विक्री बंद

महाराष्ट्रात वर्षाला सरासरी ३५ हजार अपघात होतात. ज्यामध्ये १३ हजारांहून अधिक लोक मृत पावतात. तर ३५ हजार लोक जखमी होतात. या संदर्भात प्रादेशिक परिवहन खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याने सांगितले की, जर वैद्यकीय प्रमाणपत्र अधिक कडक करण्यात आले तर अशा स्वरुपाच्या कमाल वयोमर्यादेची गरजच पडणार नाही.

रस्ते वाहतूक सुरक्षितता या क्षेत्रात काम करणारे विनायक जोशी म्हणाले, वाहनचालकांसाठी अशा पद्धतीची कमाल वयोमर्यादा जगात कुठेच नाही. मला तरी ही योजना योग्य वाटत नाही.