पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोपीनाथ मुंडेंची जयंती; पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

पंकजा मुंडे

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे समर्थकांना संबोधित करणार आहेत. पंकजा मुंडे पक्षावर नाराज आहेत अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभव, पक्षात होणारी अवहेलना यावर पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे खूप नाराज झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. यामध्ये 'आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे, अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे. त्यामुळे आज पंकजा मुंडे काय निर्णय घेणार आहेत. तसंच, कार्यकर्त्यांशी काय संवाद साधणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.  

GDP घटण्याची चिंता नाही, प्रणव मुखर्जींचे महत्त्वपूर्ण विधान

गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून मुंडे यांचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते गोपीनाथगडावर दाखल झाले आहेत. या मेळाव्यासाठी भाजपचे नेते, खासदार आणि आमदार देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

नोकरीसाठी सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत फेसबुक, गुगलची घसरण