पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बी टेक'ची फी भरण्यास पैसे नसल्यानं १७ वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या

 मृत रूपाली पवार

मोहोळ तालुक्यातील देगाव (वाळुज) येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने बी टेकच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रूपाली रामकृष्ण पवार  असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थीनीने कीटकनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपालीचा पंजाब मधील जालंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीमध्ये बी टेक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाला होता. प्रवेश पात्रतेसाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत तिने ८९ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर १० हजार रुपये भरुन कुटुंबियांनी तिचा प्रवेश निश्चित केला. उर्वरित १ लाख रुपये इतकी फी भरण्यासाठी २० जुलैपर्यंतची मुदत होती. परंतु कुटुंबियांना कमी वेळेत ऐवढी मोठी रक्कम जमा करणे शक्य झाले नाही. 

आत्महत्येचं पाउल उचलण्यापूर्वी रुपालीने फी भरुन कॉलेजला पाठवणार की नाही, यासंदर्भात कुटुंबियांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर निराश झालेल्या रुपालीने राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. बेशुद्ध अवस्थेत तिला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच सकाळी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.