पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तरुणीवर वार करुन हल्लेखोराने स्वतःला भोसकलं

अमरावती हत्या प्रकरण

अमरावतीमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाने तरुणीवर वार करुन तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोराने स्वत:ला भोसकले. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे येथे ही  धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

 

'जेएनयूतील हल्ल्याने २६/११ची आठवण करुन दिली'

प्रेमप्रकरणातून १२ वीमध्ये शिकणाऱ्या १७ वर्षाच्या तरूणाने कॉलेजला जात असलेल्या तरुणीवर चाकूने वार करत तिची हत्या केली. सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर या तरुणाने स्वत:च्या पोटावर देखील चाकूने वार केले. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला आहे. 

देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते, अनिल गोटेंची टीका

घटनेची माहिती कळताच धामणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. धामणगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

'बाळासाहेब ठाकरेंना धोका देणाऱ्याचा सत्यानाश होतो'