पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभ्यासाच्या ताणामुळे अकरावीतील मुलीची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

अभ्यासाच्या ताणतणावातून अकरावीत शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये घडली. स्वरांजली गणपत जाधव असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

हीच ती वेळ!, शिवसेनेच्या हँडलवरील ते टि्वट तेवढं अनपिन करा

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वरांजली जाधव (वय १६) ही विद्यार्थिनी मोहोळ येथील एका महाविद्यालयात अकरावी शास्त्र शाखेत शिकत होती. ती सकाळी ७ वाजता घरातून कॉलेजला गेली होती. आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात कोणीही नसताना दुपारी साडेतीनच्या सुमारास तिने घरात घूस मारण्यासाठी आणून ठेवलेले थिमेट हे विषारी औषध प्राशन केले.

महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धननं घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

बहीण शाळेतून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिला तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत अभ्यासाच्या तणावातून स्वरांजलीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. तपास मोहोळ पोलिस करत आहेत.