पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चला चला राष्ट्रपती राजवट आली, दालने सोडण्याची मंत्र्यांची वेळ झाली

मंत्रालय

महाराष्ट्रात मंगळवारपासून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू म्हणूनही काम पाहण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारीही आता माजी मंत्री झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बुधवारी शासन आदेश जारी करण्यात आला असून, माजी मुख्यमंत्र्यांसह सर्व माजी मंत्र्यांना आपल्या दालनाचा ताबा तातडीने सोडण्यास सांगण्यात आले आहे. कार्यालयातील फाईल्स, कागदपत्रे, नोंदवह्या यांचीही आवाराआवर करण्यास सांगण्यात आले आहे.

कर्नाटकातील १७ आमदारांना अपात्र ठरविणे योग्यच - सुप्रीम कोर्ट

विधानसभा निवडणुकीनंतर ८ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनीही तो लगेचच स्वीकारला. पण काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पुढील आदेश येईपर्यंत काम पाहण्यास त्यांना सांगण्यात आले. राज्यात कोणताच पक्ष सत्ता स्थापन करू शकत नसल्याचे दिसल्यावर मंगळवारी दुपारी राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. ती केंद्र सरकारने स्वीकारल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यामुळे आता राज्यात कोणतेच लोकनियुक्त सरकार अस्तित्त्वात नाही. केवळ प्रशासकीय कामकाज राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून पार पाडले जाईल. 

भाजपने शब्द पाळला असता तर ही वेळ आली नसती, शिवसेनेकडून पुन्हा टीका

सामान्य प्रशासन विभागाकडून बुधवारी सकाळी एक शासन आदेश जारी करण्यात आला असून, त्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना आपल्याकडील सर्व सरकारी वस्तूंचा ताबा प्रशासनाकडे देण्यास सूचित करण्यात आले आहे. यामध्ये फाईल्स, कागदपत्रे, नोंदवह्या, रजिस्टर्स यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मंत्रालयातील आपल्या दालनांचा ताबाही साडेपाच पूर्वी सामान्य प्रशासन विभागाकडे सोपविण्यास सांगण्यात आले आहे. हा ताबा कशा पद्धतीने द्यायचा आहे, त्याचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.