पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट; आई, मुलगा आणि वडिलांचा मृत्यू

गॅस सिलिंडर स्फोट (संग्रहित छायाचित्र)

नाशिक रोड परिसरातील एकलहरा रस्त्यावर असलेल्या एका घरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, यात कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. कुटुंबातील सर्वच व्यक्ती या स्फोटात गंभीर भाजले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना सर्वांत आधी रविवारी ३ वर्षांचा अथर्व, सोमवारी नम्रता कांबळे यांचा तर त्यानंतर मंगळवारी कुटुंब प्रमुख नरसिंग कांबळे यांचाही मृत्यू झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नाशिक रोड परिसरातील एकलहरा रस्त्यावरील संभाजीनगरातील भोर मळा येथे नरसिंग कांबळे हे पत्नी, तीन मुलांसह वास्तव्य करत होते. शुक्रवारी त्यांच्या पत्नी नम्रता (वय ४०) या नेहमीप्रमाणे सकाळी गॅस पेटवण्यासाठी गेल्या असता गळतीमुळे गॅसचा स्फोट झाला.

बजेटमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या, RSSचा केंद्राला सल्ला

या स्फोटात संपूर्ण कुटुंब गंभीर भाजले गेले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, गंभीररीत्या भाजल्याने रविवारी ३ वर्षांच्या अथर्वाचा मृत्यू झाला. सोमवारी ७०% भाजलेली त्याची आई नम्रता नरसिंग कांबळे यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या नातलगांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मंगळवारी कुटुंबप्रमुख असलेले नरसिंग रंगनाथ कांबळे यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या मागे आता ६ वर्षांचा निखिल नरसिंग कांबळे (६) आणि नेहा नरसिंग कांबळे असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून ईडीला नोटीस