पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूरः आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवेळी गॅसचे फुगे भरताना सिलिंडरचा स्फोट, ६ जखमी

सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवेळी गॅसचे फुगे भरताना स्फोट

सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनवेळी गॅसचे फुगे भरताना स्फोट होऊन सहाजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. स्पर्धा सुरु होण्याच्या काही क्षण आधी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी लगेचच बॉम्ब शोध पथक घटनास्थळी पाचारण केले होते. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळ, दुतावास बॉम्बस्फोटांनी हादरले

अधिक माहिती अशी, सोलापूर येथे आज (रविवार) आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील स्पर्धक शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान, पहाटे स्पर्धेत गॅस फुगे विकण्यासाठी एक जण आला होता. त्यांच्याकडून गॅस फुगे तयार केले जात असतानाच अचानक स्फोट झाला. यात एकूण सहाजण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. यातील ५ जणांना सीएनएक्स रुग्णालयात तर एकाला अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पूर्ण माहिती घेतल्याशिवाय सीएएवर बोलणार नाहीः विराट

जखमींची नावे पुढीलप्रमाणे

१) चंद्रकांत भिमण्णा खडाखडे (वय ३६, रा. लक्ष्मी चौक, कोळी गल्ली, सोरेगाव, ता. उत्तर सोलापूर) 
२) शमशुल अहमद सुलेमान शेख (वय ३४, गॅस फुगे भरणारे- रा. मड्डी वस्ती, शांतीनगर सोलापूर)
३) गोपाळ संतोष मुंदडा (वय २०, रा. मंगळवार पेठ, सोलापूर) 
४) मानसी दिपक मुंदडा (वय २०, मंगळवार पेठ, सोलापूर) 
५) विनायकसिंग छोटूसिंग परदेशी (वय ३०, रा. म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर) 
६) हरिदास मोहन माने (वय २०, कावेरी नगर, कुमठे गाव, ता. उत्तर सोलापूर)