पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अतिवृष्टीमुळे गणपतीपुळे देवस्थानाची सुरक्षा भिंत कोसळली

गणपतीपुळे संरक्षण भिंत कोसळली

रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका गणपतीपुळे देवस्थानाला बसला आहे. पावसामुळे गणपतीपुळे देवस्थानाची सुरक्षा भिंत कोसळली. भक्तांसाठी उभारण्यात आलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील सुरक्षा भिंत पावसामुळे ठिकठिकाणी खचली आहे. तसंच तलावाजवळची सुरक्षा भिंत देखील कोसळली आहे. त्यामुळे देवस्थानाचे मोठे नुकसान झाले आहे. 

'मराठा क्रांती ठोक मोर्चा' विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गणपतीपुळे मंदिराच्या आवारातील सुरक्षा भिंत ठिकठिकाणी कोसळली. त्यामुळे मंदिराच्या आवारत असणाऱ्या काही प्रसादाच्या दुकानांचे नुकसान झाले आहे. गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर देखील सुरक्षा भिंत कोसळली आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनामुळे मंदिर प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे. 

खूशखबर!, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सातवा वेतन 

दरम्यान, येत्या दोन दिवसामध्ये कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, गुहागरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसंचही या ठिकाणी पावसाची संततधार सध्या सुरुच आहे. रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे याठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर अनेक भागामध्ये पाणी साचले असून घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. 

'याच अ‍ॅटिट्यूडचे पैसे..' सेहवागच्या चहलला हटके शुभेच्छा!