पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कराडमध्ये कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

गोळीबार (प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एका कुख्यात गुंडावर ११ गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. पवन सोळवंडे असे मृत गुंडाचे नाव असून त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून तो पसार होता. हत्येमागचे कारण अद्याप समजलेले नाही. सोळवंडेला ११ पैकी ९ गोळ्या लागल्याचे सांगण्यात येते.

बंदुकीचे लॉक काढताना गोळी सुटली; चौघे जखमी

पवन सोळवंडे हा कराड शहर आणि परिसरात गुंडगिरी करायचा. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तो दुचाकीवरुन जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यात पवनचा मृत्यू झाला. हत्येमागचे कारण पोलिस जाणून घेत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोद करुन घेण्याची प्रक्रिया सुरु होती. 

जळगावः यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहून छापल्या १००च्या नोटा