पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर १० जणांकडून सामूहिक बलात्कार

पतीच्या समोरच या नराधमांनी पीडितेवर सामुहिक बलात्कार

सोलापूरमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर १० जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी ५ आरोपींना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे सोलापूरात एकच खळबळ उडाली आहे.

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव; सामनातून भाजपवर निशाणा

मंगळवारी दुपारी पीडित मुलगी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या परिसरात असलेल्या एका मंदिराजवळ रडत बसली होती. त्याठिकाणावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित मुलीला विश्वासात घेत चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. पीडित मुलीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या तरुणाचे इतर मित्र गेल्या सहा ते सात महिन्यांपासून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत होते. सोलापूरातील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.

आप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार; एका कार्यकर्त्याचा मृत्यू

दरम्यान, पीडित मुलगी ज्या शाळेत जाते त्या मार्गावर आरोपी रिक्षा चालवतात. पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन याप्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात पोलिसांनी आरोपींविरोधात गन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपींविरोधात भादंवि कलम ३७६ (ड), पॉस्को आणि अट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तापासाची चक्र फिरवत तात्काळ ५ आरोपींना अटक केली. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. 

उमा भारतींकडून पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना