पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खळबळजनक: नांदेडमध्ये चार शिक्षकांचा अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार

पुण्यात चिमुरडीवर बलात्कार

नांदेडमध्ये गुरु-शिष्य परंपरेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील चार शिक्षकांनी इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात या चारही नराधम शिक्षकांविरोधात पॉक्सो कायदा, कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

'केंद्रातील सरकार भाजप चालवते की मोहन भागवत?'

याप्रकरणी सय्यद रसूल, दयानंद राजुरे, प्रदीप पाटील आणि धनंजय शेळके या अत्याचार शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना साथ देणाऱ्या एका महिला कर्मचारीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी फरार झाले आहेत. 

सरन्यायाधीश शरद बोबडेंनी क्रिकेट सामन्यात केल्या १८ धावा तरीही...

या चार शिक्षकांनी सामूहिक बलात्कार करत असताना पीडित विद्यार्थीनीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याचे सांगण्यात येते. घडलेल्या सारा प्रकार या पीडितेने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पैसे आहेत, सरकारमध्ये निर्णय घेण्याची हिम्मत नाहीः गडकरी