पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाणी टंचाईची भीषण समस्या लातूरात गणेश विसर्जन नाही, मूर्ती केल्या दान

लातूरात गणेश विसर्जन नाही

पाणी टंचाईच्या भीषण समस्येस तोंड देत असलेल्या लातूरकरांसमोर गणेश मूर्तींचे विसर्जन कसं करायचं हा मोठा प्रश्न होता. पाऊस न पडल्यानं अखेर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन लातूरकारांना केलं. या आवाहनास लातूरकारांनीही भरभरून प्रतिसाद दिला. विसर्जनासाठी पाणीच नसल्यानं अनेकांनी मूर्तींचे दान केले. 

गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासन सोयी-सुविधांनी सज्ज

शहरात एकूण ३२५ मंडळांनी गणेश मूर्तींची स्थापना केली होती. मात्र, पाणी टंचाई असल्याने शांतता कमिटीच्या बैठकीतच हा प्रश्न उपस्थित झाला होता. गणेशोत्सवाच्या काळात पाऊस पडेन अशी अपेक्षा होती मात्र पावसाची अवकृपा कायम राहिली आणि लातूरकरांना मूर्तीचे दान करावे लागले. यासाठी शहरात पाच ठिकाणी संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. जागोजागी जिल्हा प्रशासनाने मूर्ती दानाचे आवाहन केले होते. सध्याची स्थिती आणि पावसाची अवकृपा लक्षात घेता लातूरकारांनीही या आवाहनाला प्रतिसाद दिला मूर्ती दान केल्या. त्यामुळे जलसंवर्धन झालेच आहे शिवाय पर्यावरणाची हानीही टळली असल्याची भावना लातूरकर व्यक्त करीत आहेत.

PHOTO : 'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक