पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाणी टंचाईमुळे लातूरमध्ये यंदा गणेश विसर्जन नाही

गणपती विसर्जन

लातूर जिल्ह्यात सध्या भीषण पाणी टंचाई आहे. यंदाच्या वर्षी पावसाने दडी मारल्यामुळे लातूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्व नदी, नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन कुठे करावे असा प्रश्न लातूरकरांना पडला आहे. आज लातूर शहरात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये यंदाच्या वर्षी गणपती विसर्जन न करता बाप्पाच्या मूर्तीला दान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

'ॐ'  आणि 'गाय' या शब्दांमुळे काहींना कापरे भरते : PM मोदी

या बैठकीला लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांच्यासह शहरातील अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी हजर होते. या सर्वांसमोर एकच प्रश्न होता यावर्षी गणेश विसर्जन कुठे आणि कसे करावे ? यावर तोडगा काढत मोठ्या गणेश मंडळाचे गणेशमूर्ती ह्या विसर्जित न करता दान करण्यात येणार आहेत. तर मोठे गणेशमूर्ती त्याच बरोबर मानाचे गणेशमूर्ती ह्या लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व गणेश मंडळाने सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.  

 

राज्यातील वाहन धारकांना दिलासा! नव्या कायद्याला तूर्तास स्थगिती

गणेशमूर्तीचे विसर्जन न करता त्या मंदिरात ठेवणे, गणेशमूर्ती दान करणे, मंडळाकडे जागा असल्यास जतन करून ठवणे तसंच घरगुती गणेशमूर्ती घरातच पाण्यात विसर्जन करणे असे आव्हान या बैठकी दरम्यान करण्यात आले. प्रशासनाने शहरात पाच ठिकाणी मूर्ती दान करण्यासाठी ठिकाणे निश्चित केली आहेत. याच ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती आणून देण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे. दरम्यान, लातूर शहरातील सर्व गणपती मंडळाने असा निर्णय घेतला आहे की, प्रशासनास सहकार्य करून एकमुखाने ज्या उपाय योजना ठरवल्या आहेत त्यावर अंलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

निष्ठेने वागायचे असल्यास भाजपशिवाय पर्याय नाही: हर्षवर्धन