पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या गणपती प्रतिष्ठापनेचे आणि गौरी आवाहनाचे मुहूर्त!

जाणून घ्या गणपती प्रतिष्ठापनेचे आणि गौरी आवाहनाचे मुहूर्त!

मागच्यावर्षी विसर्जनाच्या वेळेस आपण केलेल्या ‘पुढच्या वर्षी लवकर या..’ या प्रार्थनेनुसार गणपती बाप्पा ११ दिवस लवकरच येत आहेत. दिनांक २ सप्टेंबर रोजी सोमवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी भारतात सर्वत्र श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवशी सोमवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनी घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्या करिता कुठल्याही मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तिंची प्रतिष्ठापना माध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते.

गणपतीच्या आगमनासोबत पावसाच्याही पुनरागमनाचा अंदाज

दिनांक ५ सप्टेंबर रोजी गुरुवारी अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करावयाचे असल्याने ५ सप्टेंबर रोजी गुरुवारी वैधृती योग असला तरी दिवसभरात केव्हाही गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन असल्याने दि. ६ रोजी शुक्रवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दि. ७ रोजी शनिवारी गौरी विसर्जन दिवसभरात केंव्हाही करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा असते मात्र यावर्षी तसे नाही दिवसभरात कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल.

हैदराबादमध्ये ६१ फुटांची भव्य गणेश मुर्ती, देशातील सर्वात उंच मुर्ती असल्याचा दावा

यावर्षी दि. १२ सप्टेंबर रोजी गुरुवारी अनंत चतुर्दशी आहे. १० दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल, अशी माहिती दाते पंचांगकर्ते यांनी दिली आहे.