पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी असे मिळलीत टोलमाफीचे स्टिकर्स

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी दिली आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये टोलमाफी करण्यात आली आहे. टोलमाफीचे स्टिकर्स हे ३० ऑगस्टपासून जवळच्या पोलिस स्थानकात किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध होणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गणेशोत्सवापूर्वी ट्राफिक नियोजनासंदर्भात आयोजित केलेल्या आढवा बैठकी त्यांनी टोलमाफीची घोषणा केली होती. 

गणेशोत्सव २०१९ : घरीच बाप्पांची मुर्ती तयार करणार मराठी कलाकार

त्यामुळे कोल्हापूर आणि मुंबई गोवा मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही टोलमाफी असणार आहे. टोलमाफीची सवलत ही कोकणात जाताना आणि परतीच्या प्रवासासाठी लागू होणार आहे. कोकणात जाणाऱ्या भाविकांना उद्यापासून हे स्टिकर्स घेता येणार आहेत. यासाठी लाभार्थींनी आपला वाहन क्रमांक आणि वाहन मालकाचे नाव यांसारखी माहिती जवळच्या पोलिस स्थानकात, वाहतूक पोलिस चौकी किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये द्यायची आहे.

प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणार जीएसबी गणपती मंडळ

गणेभक्तांना गणेशोत्सवाच्या काळात वाशी, पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग, किणी तासवडे, खेड विसापूर येथील टोलनाक्यावर टोलमाफी मिळणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ganesh Utsav 2019 waive off toll on vehicles travelling to konkan how to apply for toll of stickers