पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणपतीच्या आगमनासोबत पावसाच्याही पुनरागमनाचा अंदाज

गणेशोत्सवात पाऊस पडण्याचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा गणपतीच्या आगमनासोबत महाराष्ट्रात परतण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या ३ सप्टेंबरपासून राज्याच्या काही भागात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. सोमवारी २ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होते आहे.

राहुल गांधींना तिरंग्यापेक्षा पाकिस्तानचीच जास्त काळजी - स्मृती इराणी

गेल्या दोन आठवड्यांपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पावसासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे राज्यातून मान्सून गायब झाला आहे. अधूनमधून हलका पाऊस पडत असला, तरी संततधार पाऊस झालेला नाही. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये यंदा अद्याप पावसाने ऑगस्ट महिन्याची सरासरी गाठलेली नाही. मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरी ५८२.२ मिमी इतका पाऊस पडतो. यावेळी २८ ऑगस्टला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईमध्ये ५५५.५ मिमी इतका पाऊस झाला आहे. 

हवामान विभागाचे पश्चिम विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर म्हणाले, मुंबई, दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागांमध्ये ३ सप्टेंबरपासून पावसामध्ये वाढ होईल. 

५ ते १० लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात दिलासा मिळण्याची शक्यता

स्कायमेटने सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल, असे म्हटले आहे. ३० ऑगस्टपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल, असे स्कायमेटने म्हटले आहे.