पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेशोत्सव २०१९ : ....म्हणून गणपतीला दूर्वा आणि जास्वंदाची फुले वाहतात

गणेशोत्सव २०१९

मोदक, दूर्वा आणि जास्वंदाचं लाल फुलं हे गणपतीचं विशेष आवडीचं. अशी विठुरायाला तुळस  आणि शंकराला बेल प्रिय आहे तसे गणरायास दूर्वा आणि जास्वंदाचं लाल फूल प्रिय आहे. यामागे दंतकथा सांगितली जाते ती ऐकून आपण मोठे झालो. पण पूजेत दूर्वा आणि जास्वंदाची फुले का  वाहतात, त्यांचं महत्त्व पंचागकर्ते दाते यांनी सांगितलं आहे. 

गणेशोत्सव २०१९ : घरगुती गणेशाची मूर्ती किती उंच असावी आणि का?

 दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात. या दूर्वा शक्यतो कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहाव्यात असं त्यांनी सांगितले. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणं महत्त्वाचे मानले जाते. याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण शेंदरी / लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते, असंही ते म्हणाले.