पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेशोत्सव २०१९ : दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन का केलं जातं?

गणेशोत्सव २०१९

अनेक ठिकाणी घरगुती  गणपतीचं विसर्जन हे दीड दिवसांनी केलं जातं. बाप्पांच्या आगमनाची आपण वर्षभर वाट पाहतो. मात्र दीड दिवसांनी बाप्पाला निरोप देणं थोडं जड जातं. अनेकठिकाणी गणरायाचं विसर्जन हे दीड दिवसांनी का करतात याचं उत्तर पंचागकर्ते  दाते यांनी सांगितलं आहे. 

गणेशोत्सव २०१९ : घरगुती गणेशाची मूर्ती किती उंच असावी आणि का?

मुळात गणेश चतुर्थीचे व्रत हे १० दिवसांचे नसून ते दीड दिवसांचे आहे अशी माहिती पंचागकर्ते  दाते यांनी दिली. लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सवाला  सार्वजनिक स्वरुप दिले तेव्हा चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू केला. अनेकांनी आपल्या आवडीनुसार तीन, पाच दिवस निवडले असं त्यांनी सांगितलं.

गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणताना चेहरा अर्धवट झाकणं आवश्यक असतं का?

पूर्वीच्या काळी लोक घराच्या परसातली माती किंवा नदी किनाऱ्यावरची माती आणून घरीच मूर्ती तयार करून पूजन करीत. नदीकाठच्या मातीपासून तयार केलेली मूर्ती नदी किंवा प्रवाहित पाणी  असेन तिथे विसर्जित केली जायची. सर्व देवता या पाण्याच्या आश्रयानं असतात असं सांगितलं जाते त्यामुळे पाण्यात विसर्जन करण्याला विशेष महत्त्व आहे. जर वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जन करणं शक्य नसल्यास हौद, तलाव किंवा घरीच  विसर्जन करता येईन अशी माहिती त्यांनी दिली. 

गणेशोत्सव २०१९ रेसिपी : उकडीचे पान गुलकंद मोदक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Ganesh Chaturthi 2019 story behind the tradition of Ganesh visarjan after one and half day