पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापूरातील गणेश मंडळाचा शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम

गणेश मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम

सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील सुदर्शन मध्यवर्ती गणेश तरुण मंडळाने अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. गणेश उत्सव साजर करत असताना स्पीकर, लाइटडेकोरेशन आणि इतर खर्च कमी करुन परिसरातील १६० शेतकऱ्यांना अन्नदाता सूखी भव या सनकल्पनेतुन प्रति शेतकरी ४ किलोप्रमाणे  ६४० किलो ज्वारी बियाणे व प्रति ज्वारी पिशवीनुसार ५० किलो यूरियाप्रमाणे ८ हजार किलो यूरिया वाटप करण्यात आले. 

पाणी टंचाईमुळे लातूरमध्ये यंदा गणेश विसर्जन नाही

माजी आमदार राजन पाटील यांच्या हस्ते या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. परिसरातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था आणि त्यांच्यासोमोरील  अडचणी कमी करण्यासाठी सुदर्शन मध्यवर्ती तरुण मंडळाने राबवलेला बियाणे व खत वाटपाचा 'अन्नदाता सुखी भव:' हा उपक्रम शेतकऱ्यांची उमेद वाढवणारा आणि शेतकऱ्यांविषयी सदभावना जागृत करणारा असल्याचे  राजन पाटील यांनी म्हटले आहे.

४८ नगरसेवकांसह गणेश नाईकांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

१० सप्टेंबर रोजी कामती खुर्द येथील सुदर्शन मध्यवर्ती तरुण मंडळाच्या वतीने गावातील गरजू, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक बॅग ज्वारीचे बियाणे आणि एक बॅग खत प्रातिनिधिक स्वरूपात १० शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. उर्वरित १६० शेतकऱ्यांनी कुपन देऊन स्वतः  बियाणे घेऊन जाण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.