पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पूजा योग्यप्रकारे न झाल्यास गणपती रागावतो या भीतीयुक्त समजामागचं तथ्य

गणेश चतुर्थी 2019

अनेक घरगुती गणपतींचे विसर्जन झाले आहे. अनेकांच्या घरी दीड, पाच, सात दिवसांसाठी गणपतीचे आगमन होतं. या दिवसांत गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. विविध पक्वान्ने, लाडू मोदकांचा नैवेद्य बाप्पांच्या चरणी अर्पण केला जातो. गणराय हे महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत आहे. तरीही आपल्याकडे अनेक गैरसमज आहे. यातला सर्वात मोठा भीतीयुक्त गैरसमज म्हणजे पूजा योग्यप्रकारे न झाल्यास गणपती रागावतो हा होय. या मान्यतेत किती तत्थ आहे याचं उत्तर दाते पंचागकर्ते यांनी दिले आहे. 

गणेशोत्सव २०१९ : दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन का केलं जातं?

आपण एखाद्या देवतेची पूजा करताना ती मनापासून व श्रद्धेने करावी, मनापासून व श्रद्धापूर्वक पूजा करणाऱ्यांना अशी भीती वाटण्याचं कारण नाही. गणपती रागावतो या समजात काहीही तथ्य नाही असं ते म्हणाले. माझ्या ज्ञानाप्रमाणे, मला उपलब्ध असलेल्या पूजा साहित्यानुसार हे गणेशा मी तुझे पूजन करीत आहे, असे पूजेच्या संकल्पामध्ये म्हटलेच आहे. 

गणेशोत्सव २०१९ रेसिपी : माव्याचे मोदक

गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणतो, तो आपली सगळी विघ्नं हरतो मग तो आपल्यावर पूजा न केल्यास रागवेल ही समजूत अत्यंत चुकीची आहे. हे गैरसमज कधीही मनात आणू नये असं त्यांनी सांगितलं आहे.