पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इको-फ्रेंडली गणपती आणि मूर्तींचं विसर्जन घरात करणं कितपत योग्य?

गणेशोत्सव २०१९

पीओपींच्या मूर्तींमुळे होणारं पर्यावरणाचं नुकसान पाहता अनेकांनी पर्यावरण पूरक असा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आहे. पीओपी मूर्तींऐवजी शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्तींना प्राधान्य दिलं जातं. हल्ली ट्री गणेशा ही संकल्पनाही रुजू होत चालली आहे. अनेकजण घरच्या घरीच गणेश मूर्तीचं विसर्जन करतात. तेव्हा एको फ्रेंडली गणपती आणि  घरीच गणेश मूर्तींचं विसर्जन करणं हे शास्त्राला धरून आहे का? या प्रश्नांचं उत्तर दिलंय पंचागकर्ते दाते यांनी

पूजा योग्यप्रकारे न झाल्यास गणपती रागावतो या भीतीयुक्त समजामागचं तथ्य

आपले सर्व सण उत्सव हे निसर्गाशी सांगड घालूनच साजरे होतात. गणेशोत्सवातील गणपतीची मूर्ती मातीची असावी. पीओपी हे निसर्गासाठी हानिकारकही आहे आणि ती माती देखील नाही. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती हा निसर्गाच्या आणि मातीच्या अधिक जवळ जाणारा त्यामुळे इको फ्रेंडली गणपतीचं पूजन शास्त्राला धरूनच असल्याचं पंचाग कर्ते दाते यांनी सांगितलं 

मूर्तीचे विसर्जन पाण्यातच करावे, मोठ्या बादलीत पाणी घेऊन घरीच विसर्जन करता येऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं. नंतर ती बादली काही दिवस झाकून ठेवावी व कालांतराने ते पाणी व माती आपल्या घराच्या परसात, कुंड्यांमध्ये, बागेत वापरून टाकावे असंही दाते यांनी सांगितलं.