पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेश मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जित करावी का?

गणेशोत्सव २०१९

दीड, पाच, सात दिवसांच्या घरगुती गणेशाचं विसर्जन पार पडलं आहे. गणेश मूर्तीचं विसर्जन हे वाहत्या पाण्यात करण्याची प्रथा आहे, असं म्हटलं जातं. गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन हे वाहत्या पाण्यात  का केलं जायचं यामागचं कारण दाते पंचागकर्ते यांनी सांगितलं आहे. 

पूजा योग्यप्रकारे न झाल्यास गणपती रागावतो या भीतीयुक्त समजामागचं तथ्य

पूर्वीच्या काळी लोक घराच्या परसातली माती किंवा नदी किनाऱ्यावरची माती आणून घरीच मूर्ती तयार करून पूजन करीत. नदीकाठच्या मातीपासून तयार केलेली मूर्ती नदी किंवा प्रवाहित पाणी  असेन तिथे विसर्जित केली जायची. सर्व देवता या पाण्याच्या आश्रयानं असतात असं सांगितलं जाते त्यामुळे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याला विशेष महत्त्व आहे, असं त्यांनी सांगितलं. 

केदार जाधवने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन

मात्र हल्ली जर वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जन करणं शक्य नसल्यास हौद, तलाव किंवा घरीच  विसर्जन करता येईन असंही ते म्हणाले. जर वाहत्या पाण्यात मूर्तीचं विसर्जन करणं शक्य नसेन तर मोठ्या बादलीत पाणी घेऊन घरीच विसर्जन करता येते. मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर ती बादली काही दिवस झाकून ठेवावी व कालांतराने ते पाणी व माती आपल्या घराच्या परसात, कुंड्यांमध्ये, बागेत वापरून टाकावे असा उपाय त्यांनी सुचवला आहे.