पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणताना चेहरा अर्धवट झाकणं आवश्यक असतं का?

गणेशोत्सव २०१९

पुढील आठवड्यास गणेशोत्सवास सुरूवात होत आहे. गणपती म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं आराध्य देवैत आहे. वर्षभरापासून गणेशभक्तांना लाडक्या  बाप्पांच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. मुंबईसारख्या शहरात गणेशाच्या आगमन सोहळ्यास सुरूवात झाली आहे. काही मोठ्या मंडळांचा आगमन सोहळा पारही पडला आहे. तर घरगुती गणपतीचे आगमन हे गणेश चतुर्थीदिवशी होणार आहे.

जाणून घ्या गणपती प्रतिष्ठापनेचे आणि गौरी आवाहनाचे मुहूर्त!

काही जण चित्रशाळेतून आदल्या दिवशी गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणतात. ज्यावेळी चित्रशाळेतून बाप्पांची मूर्ती घरी आणली जाते तेव्हा तिचा चेहरा हा अर्धवट झाकला जातो. मूर्तीचा चेहरा अर्धवट झाकण्यामागे अनेक दंतकथा  आहेत. या दंतकथेतूनच मूर्तीचा चेहरा अर्धवट झाकण्याची प्रथा रुथ झाली.  मात्र गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी आणताना चेहरा अर्धवट झाकणं खरंच आवश्यक असतं का? या प्रश्नाचं उत्तर  दाते पंचांगकर्ते यांनी दिलं आहे. 

गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेला आणताना असा चेहरा झाकण्याची आवश्यकता नाही. काही प्रदेशात अशा प्रकारची रूढी आहे. पण धर्मशास्त्रीयदृष्ट्या त्याला काहीही कारण नाही असं पंचांगकर्ते दाते यांनी सांगितलं.

मुंबईतल्या या १० प्रसिध्द गणेशोत्सव मंडळांना जरुर भेट द्या

गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेताना ज्याच्या हातात गणेशाची  मूर्ती असेल त्या व्यक्तीनं डोक्यावर टोपी घालणं किंवा रुमाल घेण्यामागचं कारण काय आहे हे देखील त्यांना सांगितलं.  कोणतेही धार्मिक कार्य करताना ठराविक वेषभूषा असते. पूर्वीच्या काळी सर्वच लोक डोक्यावर टोपी, मुंडासं, पगडी वापरायचे तसेच खांद्यावर उपरणं असा पूर्वीच्या लोकांचा परीपूर्ण पोशाख असायचा. हल्ली तसे नसते म्हणून परंपरा जपता यावी यासाठी आवर्जून डोक्यावर टोपी घालावी असं सांगण्यात येतं.