पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय सूडबुद्धीतूनः थोरात

बाळासाहेब थोरात

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीने घेतला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोपः उद्धव ठाकरे

थोरात पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांशी राजकीय सुडबुद्धीने वागणे ही मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपची कार्यपद्धती राहिली आहे. मोदी-शहा यांना विरोध आणि विरोधी पक्षच मान्य नाही. म्हणून ते सातत्याने विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे देशातील जनता पाहत आहे. गांधी कुटुंबातील दोन सदस्य देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले याचा भाजप सरकारला विसर पडला आहे का? असा संतप्त सवाल करून सरकारने सुडाचे राजकारण थांबवून गांधी कुटुंबीयांना एसपीजी सुरक्षा प्रदान करावी असेही थोरात म्हणाले म्हणाले.

'बाळासाहेबच म्हणाले होते, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री'