पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीत पूर ओसरला; महामार्ग अद्याप बंद

गडचिरोली पूर

गडचिरोलीती जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतली आहे. पूराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र पुन्हा जर पावसाला सुरुवात झाली तर पूर येण्याची शक्यता आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्ह्याला झोपडपून काढले होते. भामरागड आणि अहेरी तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली होती. तर ३०० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला होता. आता पावसाने विश्रांती घेतली असून पूराचे पाणी ओसरत आहे. 

 

सरकार आपले डोळे कधी उघडणार?, प्रियांका गांधींचा मार्मिक प्रश्न

दरम्यान, चंद्रपूर आणि अहेरीला जोडणारा महत्वाचा मार्ग अजूनही बंद आहे. आष्टी पुलावरील पाणी पुलाच्या खाली असले तरी खबरदारी म्हणून सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पुलावर बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. सोबतच पोलिसांचा  बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. वैनगंगा नदी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. कारण नदीची पाणी पुलावरुन वाहत आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. 

गूड न्यूज! राज्यातील ग्रामीण रस्त्यांसाठी २० कोटी डॉलरचा करार

पावसामुळे अहेरी आणि भामरागड तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली होती. पूराचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. भामरागड इथे पुरानंतर साचलेली घाण  नागरिकांनी स्वच्छ करायला सुरुवात केली. पोलिस आणि नागरिकांच्या सामूहिक श्रमदानातून ही स्वच्छता मोहीम केली जात आहे. भामरागड पुरामुळे जलमय झाले होते. सुमारे ८० टक्के गावं पाण्याखाली होती. आता पूर ओसरल्यानंतर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावर चिखल साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. 

एनकाऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा स्वीकारला