पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: घातपाताचा कट उधळला; १५ किलो स्फोटकं निकामी

नक्षलवाद्यांचा कट उधळला

गडचिरोली जिल्ह्यात मोठा घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. लाहोरी-धोडराज रस्त्यावर नक्षलवाद्यांनी लावलेली १५ किलो स्फोटकं पोलिसांनी निकामी केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

'पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव पक्षातील लोकांमुळेच'

नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळला आहे. गडचिरोली पोलिस दलाने उपविभाग भामरागडअंतर्गत येणाऱ्या लाहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले. या अभियाना दरम्यान रस्त्यावर नक्षलवादयांनी घातपाताच्या दृष्टीने पुरुन ठेवलेले अंदाजे १५ किलो वजनाचे क्लेमोर माईन सापडले. 

कर्नाटकात मतदान सुरु, निकालावर भाजप सरकारचे भवितव्य

दरम्यान, घटनास्थळी गडचिरोली बॉम्ब शोधक व नाशक पथकाची टीम तातडीने घटनास्तळी दाखल झाली. या टीमला क्लेमोर माईन घटनास्थळीच सुरक्षितरित्या निकामी करण्यात यश आले. गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

VIDEO: अरबी समुद्रात अडकलेल्या २६४ मच्छिमारांची सुटका