पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रायफल साफ करताना गोळी सुटली; पोलिसाचा मृत्यू

गडचिरोली पोलिस

गडचिरोलीमध्ये एका पोलिसाचा गोळी लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. रायफल साफ करत असताना त्यामधून गोळी सुटली. ही गोळी पोलिसाला लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील सिरोंचा पोलिस वसाहतीमध्ये ही घटना घडली आहे.

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी करणार 'समजोता

संजीव शेट्टीवार असं या मृत पोलिसाचे नाव आहे. संजीव गडचिरोली पोलीस दलातील सिरोंचा पोलीस ठाण्यामध्ये शीघ्र कृती पथकात कार्यरत होते. संजीव आज सकाळी साडेसात वाजता आपल्या राहत्या घरी रायफल साफ करत होते. त्याच दरम्यान, रायफलमधून अचानक गोळी सुटली. ही गोळी संजीव यांच्या डोक्यात घुसली. 

इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; नितीन गडकरी करत होते प्रवास

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या संजीव यांना कुटुंबियांनी ताबडतोब सिरोंचा सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजन असल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी संजीव यांचे कुटुंबिय घरामध्येच होते. या बाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. गडचिरोली पोलीस दल या घटनेचा पुढील तपास करत आहेत.  

केरळमध्ये पूरबळींचा आकडा ८८ वर; ४० जण बेपत्ता