पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोली पोलिसांना यश; ६ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली पोलिस

गडचिरोली पोलिसांसमोर ६ जहाल नक्षलवाद्यांनी मंगळवारी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ५ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. कसनसुर दलमचे हे ६ जहाल नक्षलवादी आहेत. या नक्षलवाद्यांवर जाळपोळ, चकमत, अपहरण, हत्या यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शासनाकडून त्यांच्यावर ३१ लाख ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. नक्षल चळवळीत होणारी पिळवणूक आणि पोलिस खात्याची बदललेली रणनीती पाहता या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

'एकच वादा..अजितदादा', मंत्रिमंडळ स्थापण्याआधी समर्थकांची घोषणाबाजी

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये संदिप उर्फ महारू चमरू बढे (३० वर्ष), मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनुराम कुरवामी (३० वर्ष), स्वरपा उर्फ संथिला उर्फ सरीता सुकलु आतला (२३ वर्ष), अनी उर्फ मिला मोतीराम तुलावी (२५ वर्ष), ममिता उर्फ ममता जन्ना राजु पल्लो (२० वर्ष), तुलसी उर्फ मासे सन्तु कोरामी (२४ वर्ष) यांचा समावेश आहे. 

काँग्रेसकडूनच SPG सुरक्षा कायद्यात वारंवार बदल, अमित शहांचा पलटवार

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ मध्ये आजपर्यंत एकुण २९ माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. यात ०३ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०१ दलम उपकमांडर, २२ सदस्य, ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. तर २१ माओवादयांना अटक करण्यात पोलीसांना यश प्राप्त झाले आहे. तर सन २००५ आजपर्यंत एकुण ६३३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले: खडसे