पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंगणघाट पीडितेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

हिंगणघाट प्रकरण

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दारोडा गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानभूमीत पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दारोडा गावात शोकाकुल वातावरण आहे. अंत्यसंस्कारापूर्वी दारोडा गावातून पीडितेच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. पीडितेला अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. तसंच, हिंगणघाटच्या आसपासच्या गावातील गावकऱ्यांनी देखील पीडितेला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.

हिंगणघाट प्रकरणी ग्रामस्थ संतप्त; पोलिस आणि रुग्णवाहिकेवर दगडफेक

हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा सोमवारी सकाळी ६.५५ वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संतप्त झालेल्या दारोडा गावातील गावकऱ्यांनी रास्तारोको केला. आरोपीला फासावर लटकवा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. पीडितेचे पार्थिव घेऊन दारोडा गावात दाखल झालेल्या रुग्णवाहिकेवर संतप्त झालेल्या दारोडा ग्रामस्थांनी दगडफेक केली. यावेळी पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. 

चकमकीत २ कोब्रा कमांडो शहीद, एका नक्षलवाद्याचाही खात्मा

तर, हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. तसंच असे कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही असा कायदा आणू, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी आरोपी विक्की नगराळे यांने पीडित तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित तरुणी ४० टक्के भाजली होती. तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचठिकाणी तिचा मृत्यू झाला. याप्ररणातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. 

... या तीन कारणांमुळे दिल्लीत विजयाचा भाजप नेत्यांना विश्वास